को’रोना लॉक’डाउन मध्ये माझ्या वडिलांनी त्याच्या जवळच्या मित्राकडून फ्लॅट विकत घेतला होता

एप्रिल २०२०, कोरोना लॉकडाउन मध्ये माझ्या वडिलांनी त्याच्या जवळच्या मित्राकडून फ्लॅट विकत घेतला होता, जो बिल्डर होता, परंतु तो त्याच्या नावावर नव्हता आणि काही परिस्थितींमुळे आम्ही आमच्या वडिलांच्या नावे नोंदवू (रजिस्ट्रेशन करू) शकलो नाही.

माझ्या वडिलांनी त्याच्या मित्राबद्दल खात्री होती की वडील जेव्हा त्याला कॉल करतील तेव्हा तो फ्लॅट रजिस्ट्रेशनसाठी तयार होईल. वडिलांच्या मित्रा बद्दल काही नकारात्मक बातम्या आल्यामुळे बाकी लोकांनी आम्हाला लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी आमच्याकडे रजिस्ट्रेशनसाठी पैसे कमी पडले आणि ते आम्ही देवावर सोडले. दिवसेंदिवस माझ्या आईवडिलांना त्रास होत होता की “त्याचे मित्र म्हणून अशी एखादी व्यक्ती आहे जी आपल्याकडे भरपूर पैसे असल्यामुळे कोणत्याही प्रकारची वाईट गोष्टी करू शकते किंवा आम्हाला फसवू शकते”.

मी आणि माझी आई दर गुरुवारी स्वामी स्मरण करतो आणि मी माझ्याआईला स्वामींना नवस बोलण्यास सांगितले आणि निश्चितच सर्व काही सुरळीत होईल असा विश्वास दिला. माझे पालक रजिस्ट्रेशनची तारीख निश्चित करण्यासाठी आणि सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मित्राच्या कार्यालयात गेले. मित्र पुढे येण्यास तयार नव्हता आणि त्याने आम्हाला खूप टेन्शन दिले. त्याचा हेतू काय आहे हे आम्हाला माहित नव्हते कारण आम्ही त्याच्याकडून फ्लॅट खरेदी केला होता आणि आता तो हे सर्व पुढे पुढे ढकलत आहे.

तेथून माझे पालक साइट मालकाच्या घरी गेले आणि त्यांना विनंती केली परंतु आम्ही त्यांच्याकडून घर खरेदी केली नसल्याने तो काहीही करू शकात नव्हता. माझ्या पालकांना काय करावे हे त्यांना समाजात नव्हते.

दरम्यान माझ्या आईने माझ्या वडिलांच्या मित्र कार्यालयात स्वामींचा भव्य असा फोटो पाहिला होता आणि तिला विश्वास होता की दोघेही(वडिलांचा मित्र आणि साइट मालक) नोंदणीसाठी सहमत होतील आणि त्यांनी दोघांनाही पटवून दिले आणि नोंदणीची तारीख निश्चित केली. जेव्हा माझ्या वडिलांनी त्याच्या मित्राला आणि साइट मालकास तारखेची माहिती देण्यासाठी कॉल केला तेव्हा त्यांनी पुन्हा असा गोंधळ उडाला.

नोंदणीची वेळ जवळ येत असल्याने ते येणार की नाही याचा विचार करत होते आणि माझे पालक पहाटेपासूनच प्रतीक्षा करीत होते. सब रजिस्टर कार्यालत मी स्वामींना अशी विनंती केली की कृपया हे घडवून आणा कारण माझे आई-वडिल माझ्या जोडीदारामुळे नैराश्यात (माझ्या पतीने मला सोडल्यामुळे) आणि तणावात होते आणि शेवटच्या क्षणी ते दोघेही आले योग्य वेळी आणि रजिस्ट्रेशन केले गेले. हे सर्व फक्त स्वामींमुळे घडले. धन्यवाद स्वामीं.