प्रत्येकाचं यश एखाद्याच्या हातात लपलेले असते. हाताच्या रेषा व्यक्तीचे भविष्य प्रकट करतात. ज्या लोकांच्या हाती भाग्य रेषा आढळली असते ते धनवान असतात आणि जीवनात उच्च स्थान प्राप्त करतात. चला तर मग जाणून घेऊया भाग्य रेषांबद्दल-
भाग्य रेषा –
भाग्य रेषा प्रत्येकाच्या हातात सापडत नाही. भाग्य रेखा केवळ भाग्यवान लोकांच्या हातात आढळते. तळहातावरील ही रेषा चंद्र पर्वतापासून सुरू होते आणि वृहस्पति पर्वतावर संपते. ज्या हातामध्ये अशी रेषा आढळली आहे ते लक्षाधीशझाले आहेत. भाग्य रेषा हि मस्तिक रेषा आणि हृदय रेषातून जाते.
सरळ व दोष मुक्त भाग्य रेषा
भाग्य रेषा जितकी लांब आणि दोष मुक्त असेल तितकेच त्या व्यक्तीची श्रीमंती जास्त असते. अशा लोकांचे आयुष्य खूप सुखात असते. अशा लोकांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची कमतरता नसते.
दोष युक्त भाग्य रेषा –
जर भाग्य रेषा लहान आणि तुटलेली असेल तर एखाद्यास जीवनात अडथळे किंवा संकटाचा सामना करावा लागतो. मोडलेली भाग्य रेखा जीवनात होणाऱ्या नुकसानाविषयी देखील सांगते.
सरळ भाग्य रेषा –
सरळ भाग्य रेषा ही सर्वोत्तम भाग्य रेषा मानली जाते. चंद्र पर्वतापासून प्रारंभ होऊन वृहस्पति पर्वताजवळ संपणारी भाग्य रेषा सर्वात चांगली मानली जाते. राहू स्थानापासून सुरू होणारी भाग्य रेषा एखाद्यास आयुष्यात अचानक लाभ घडवून आणते. अशा लोकांना आयुष्यात अचानक संपत्ती देखील मिळते.
मजबूत भाग्य रेषेतून असे मिळवा लाभ –
कधीकधी असे दिसून आले आहे की एखाद्या व्यक्तीला मजबूत भाग्य रेषा रेखाटल्यानंतरही पूर्ण लाभ मिळत नाही. यासाठी दररोज संध्याकाळी भगवान शिव यांची पूजा करावी आणि घराच्या मुख्य दरवाजावर तूपांचा दिवा लावावा. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वादाने आपण श्रीमंत आणि सुखी होतो.