नमस्कार मंडळी,
कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…
विनोद १- बायको : तुम्हाला झाडावर चढता येतं का?
नवरा : नाही …. बायको : तुमच्यापेक्षा माकड बरं!
अपमान सहन न झाल्याने १५ दिवस प्रॅक्टिस करून झाडावर चढण्यात तरबेज झाल्यावर ….
नवरा : आता मला झाडावर चढता येतं!
बायको : मग तुमच्यात आणि माकडात फरक काय?
विनोद २- *पुण्याचे दोन वकील कोर्टा जवळच्या हॉटेलात बसून आपला आपला डबा काढून जेवण्याच्या तयारीत होते*
*तेव्हढ्यात वेटर ने त्यांना पाटी दाखवली “स्वतःच्या घरून आणलेला डबा, इथे बसून खाण्यास मनाई आहे”*
*ते एकतर वकील, ते ही पुण्याचे…*
*दोघांनी आपल्या आपल्या डब्यांची अदलाबदल केली आणि डबे फस्त केले* 🥺🤭🤪😂😜
विनोद ३- दवाखान्यात नंबर लावून बरेच जण बसले होते.
वेळ घालवायला सहज म्हणून एक पेशंट वजनकाट्यावर उभा राहिला.
पोट आत घेण्याचा त्याचा प्रयत्न पाहून…
दुसरा पेशंट- असं करून काही फरक पडणार नाही… .
*नाही कसं … असं केल्यावरच मला काट्यावरचा आकडा दिसतो !!!* 😅🤣🤣🤣🤣
विनोद ४- एक रिटायर्ड काका धान्याच्या दुकानात गेले. दुकानातल्या मुलाला सांगितलं की, मला 742 दाणे मसूर पाहिजेत.
मुलाने शांतपणे 200 ग्राम मसूर वजन केली व ती बांधून काकांकडे दिली. काका हैराण झाले.
म्हणाले की हे 742 दाणे आहेत का? मुलगा म्हणाला, घरी जाऊन मोजून बघा. बरोबरच असणार. कशावरून???काकांनी विचारलं.
माझ्या वडिलांनी 1 किलो मसुरचे 3710 दाणे कालच मोजलेत. या हिशेबानं 200 ग्राममध्ये 742 दाणे येतात.
अरे वा….काय करतात तुझे वडील?कुठे असतात??🤔 *काही नाही. तुमच्यासारखेच रिटायर्ड आहेत. कामधंदा नाही. उगीचच नको तिथे त्रास देतात.
म्हणून कालच मी त्यांच्याकडून ते दाणे मोजून घेतलेत. आज 1 किलो राई मोजायला बसवलंय.🤨* 😅एक त्रस्त व्यापारी😆
विनोद ५- *वडील (रागाने)* :- एक काम धड होतं नाही तुझ्याकडून , तुला “कोथिंबीर” आणायला सांगितली होती पण तू “पुदीना” घेऊन आलास.
तुला कोथिंबीर आणि पुदीन्यातला फरक कळत नाही? चल चालता हो घरातून.. तू काही कामाचा नाहीस.
*मुलगा* :- चला बरोबरच जाऊ घरातून.. *वडील* :- का ?
*मुलगा* :- कारण की …. आई म्हणते की ही *मेथी* आहे..😅🤣🤣🤣🤣
विनोद ६- बंड्या रात्री गाढ झोपेत असताना सांताक्लाँजने त्याला उठवून विचारले ” काय Wish आहे तुझी?
बंड्या: मला नविन बायको पाहिजे…हि जाम भांडते.
सांताक्लाँजने बंड्याला धू-धू धूतला…….
कारण बायकोच सांताक्लाँज बनून आली होती….🤣🤣🤣🤣
विनोद ७- तो: आज डॉक्टरकडे जाऊयात का ?
ती: काहो ? तो: अगं बरं वाटत नाहीये. सारखे भास होताहेत. डोळे मिटले की एक हिरव्या साडीवाली बाई समोर येते आणि मला ओढु लागते..
ती:( पदर खोचीत) थांबा आलेच दोन मिनीटात. 😠 तो: अगं कुठं चाललीस ????
ती : तन्मयच्या मम्मीकडे. काल सटवी वडाला फेऱ्या मारताना सारखा सारखा माझ्या दोऱ्यात दोराअडकवीत होती…. 😡🤪😃😆🤓
विनोद ८- *मुलगा* : बाबा, टीचरनी उद्या शाळेत कुल्फी घेऊन यायला सांगितलंय…
*बाबा* : अरे पण कशी नेणार? शाळेत जाईपर्यंत ती वितळून जाईल. तुझ्या टीचर आपल्या घराजवळच राहतात; मी नेऊन देईन.
सकाळी टीचरच्या घरी… *बाबा* : नमस्कार टीचर. ही घ्या. तुमच्यासाठी गारेगार कुल्फी आणलीये……*टीचर* : कुल्फी? ती कशाबद्दल?
*बाबा* : तुम्ही शाळेत घेऊन यायला सांगितली असा मुलाने निरोप दिला मला; पण तो लहान आहे आणि कुल्फी वितळली असती म्हणून मी स्वतःच घेऊन आलोय …
*टीचर* : तुमचा मुलगा लहान आहे हे मलाही माहीत आहे. पण तो तोतला आहे, हे तुम्हाला ही माहीत असायला हवं;
मी त्याला *कुल्फी* नाही, *स्कूल फी* आणायला सांगितली होती…!!! 😂🤣😂
विनोद ९- सकाळी सकाळी नवरा न्युज पेपर वाचत होता…
अचानक नवऱ्याने बायकोच्या च ड्डीत हाथ टाकला…
बायको पटकन लाजली..
बायको- अहो सकाळी नको ना…
नवरा- अगं वेडे… न्युज पेपर ची पान पलटण्यासाठी
बोट ओला करतोय…. बायको जागेवर बे शुद्ध
विनोद १०- जिव्हारी लागेल असा अपमान
IT employee working from home …….
आई – जा बाळा , बाजारातून जरा सामान घेऊन ये
मुलगा – आई , आत्ता client चा काॅल आहे. नंतर जाऊ शकतो का ?
आई – I am working on that आणि I will get back to you soon एवढच बोलायच आहे ना .. मी बोलते ..
तु सामान घेऊन ये ……😆😆
कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…