एकदा रो मँ टिक रात्री पाऊस चालू होत….

आजच्या धकाधकीच्या….

आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात.

विनोद 1 – बायको: माझ्यासाठी एवढे कर, वाघाची शिकार कर,
मला वाघाचे कातडे आपल्या दिवाणखान्यात लावायचे आहे..
नवरा: हे कसे शक्य आहे, दुसरे एखादे सोपे काम सांग…
बायको: ठीक आहे, तुझे whatsapp मेसेजेस दाखव…
नवरा: वाघ साधा हवा का पांढरा…..?
– अखिल भारतीय बायकोला घाबरून लगेच ऐकणारी संघटना..

विनोद 2 – प्रियकर: प्रिये तुझी आठवण
आली,की तुझा फोटो समोर घेऊन तुला बघत राहतो.
प्रियसी- मग माझ्या आवाजाची आठवण
आली तर काय करतोस ?….
प्रियकर: मग काय एखाद्या कुत्रिला दगड मारतो

विनोद 3 – सासरे जावयाला समजावत असतात
सासरे: तू ड्रिंक करतोस अस मी ऐकले आहे?
जावई: हो
सासरे: किती?
जावई: आठवड्यातून तीनदा

सासरे: किती वर्ष झाली पितोय?
जावई: 30 वर्ष
सासरे: एक ड्रिंक चा साधारण खर्च किती असेल?
जावई: 500 रु
सासरे: म्हणजे आठवड्याचे 1500,महिन्याचे 6000,वर्षाचे 72000, 30 वर्षाचे 21,60,000

हेच पैसे तू fix deposit मध्ये टाकले असते तर आतापर्यंत त्याचे 60,00,000 झाले असते,
एवढ्या पैशात एक हाय क्लास मर्सिडीज आली असती जावई: तुम्ही किती ड्रिंक करतात?
सासरे: नाही,अजिबात नाही
जावई: मग तुमची मर्सिडीज कुठे आहे?

विनोद 4 – एकदा खेड्यातील आजोबा आपल्या मुलाकडे शहरात जातात,
तेव्हा त्या मुलाची बायको तिच्या बंडूवर ओरडत असते.
आजोबाः सूनबाई का आराडतीयास पोरावर….

सूनबाईः बघाना मामांजी बंडू नुसतच कोलगेट खातोय…
आजोबाः बंडू नुसत कोलगेट खायाच नसत, चपाती संग खायाच असत..
सूनबाई, दवाखान्यात

विनोद 5 – सारिता सकाळी सकाळी समोरच्या ताईंशी बोलत होती…
“रोज रोज गाय आणि कुत्रा कुठे शोधणार ????
म्हणून रोज सकाळी पहिली पोळी मी खाते आणि शेवटची पोळी यांना टिफिनमध्ये देते …..”

विनोद 6 – वडील: बबन, लक्षात ठेव आज गणिताच्या पेपरमधील जेवढी
उत्तरे चुकतील तेवढय़ा छड्या मारेन.
संध्याकाळी बबनला वडील म्हणाले किती प्रश्न चुकले?
बबन: एकपण नाही बाबा. तुमची धमकी मी लक्षात ठेवली.

वडील: याचा अर्थ सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहिली, होय ना?
बबन: नाही बाबा, मी एकही प्रश्न सोडवला नाही.

विनोद 7 – मुंबईकर मुलगी: Excuse me
सातारकर मुलगी: सरकता का please
विदर्भकर मुलगी: सरकून राहिला का

सांगलीकर मुलगी: सरकता का जरा
कोल्हापूरकर मुलगी: सरक ना भावा, आणि सगळ्यात Top
. . . . सोलापूरकर मुलगी: ए बधीर सरक ना, रस्ता काय तुझ्या बापाचा आहे काय??

विनोद 8 : एकदा रोमँ##टिक रात्री पाऊस चालू होत….
बायको रात्री नवऱ्याला सांगते… अहो मला खूप थंडी वाजत आहे…
नवरा: लवकर कपडे काढ आणि दुसरे कपडे घालून घे
ओले कपडे असल्यामुळे थंडी वाजणार ना…

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात.