स्वामींच्या तारक मंत्रची लीला अपरंपार आहे, दुःखाचे दिवस होतील दूर होणार संकटमुक्त आणि धनवान

“तारक मंत्रचा” फायदा :
स्वामी तारक मंत्र ऐकल्याने मन तृप्त होत व दिवस चांगला जातो. तुमच्या घरावर जर कोणते संकट असेल, मुले चिडचिड करत, भांडन तंटा असेल किंवा घरात शांतात नसेल तर तारक मंत्र खूप फायदेशीर ठरतो. तारक मंत्रच्या जपाने घरात शांतता येते.

“तारक मंत्रचा” जप कसा करावा :
प्रथम श्री स्वामींच्या प्रतिमेला दीप व उबत्ती लावा. एका तांब्याच्या पात्रात पाणी घ्या. त्या पात्रावर हाथ ठेऊन तारक मंत्रचा जप करा. मंत्र जाप झाल्यावर ते पाणी चिडचिड करणाऱ्या व्यक्तीस द्या व घराच्या शिंपडा. तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल.

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र :
नि:शंक हो निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे, अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविन काळ ना नेई त्याला परलोकीही ना भिती तयाला, उगाची भितोसी भय हे पळु दे. जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे, जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरु तु असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेसहीत, कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगु स्वामी देतील साथ, विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच ह्या पंचप्राणामृतात, हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती. श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु ||